ladka shetkari


आमचे सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट देण्याचं काम आहे. आमचे सरकारचे एकच धोरण आहे कष्टकरी, वारकरी ,सुखी शेतकरी अशा प्रकारचे आपण धोरण राबवत आहे. म्हणून मी आज तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ला आली लाडका भाऊ यांना आली, या योजनांची आम्ही घोषणा केली ,त्या योजना सुरू केले. आता आम्ही “आमचा लाडका शेतकरी” योजना सुरू करणार आहोत.

अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. आज बीडमध्ये राज्य सरकारने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री यांनी या योजनेची घोषणा केली.