Free Flour Mill Scheme :- महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. शंभर टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे. या योजनामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
मोफत पिठाची गिरणी अर्ज करण्यासाठी क्लिक करा
मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबविण्यात येणार आहे एक महत्त्वाची योजना आहे. मोफत पिठाची गिरणी डाळ गिरणी मसाला गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रात सर्व जिल्हा शासनाकडून राबविण्यात येत आहे.
लाभ कोणत्या महिलांना मिळेल :-
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे. मायला वर्ग स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनाने मार्फत ही योजना राबवली जात आहे. म्हणून या योजनेचा लाभ केवळ महिलांना घेता येणार आहे.
माझी लाडकी बहिण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे. ज्या महिलाचे एक लाख वीस हजार पेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजने करिता पात्रता;
१) या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व महिलांना घेऊ शकतात.
2) मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना घेता येईल.
3) ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभागात अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन अर्ज करावा.
उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात..! राज्य सरकारचा मोठा निर्णय
या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात तुम्हाला जे योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्या योजनेविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी .तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू आहे की नाही याची माहिती घ्यावी योजना सुरू असेल तर अर्ज करण्याची पद्धत विचारावी मग पूर्ण तयारीने आपले अर्ज सादर करावा.
या योजनेचा अर्ज ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे आपल्याला भरता येतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाचा नमुना लागेल तो तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागात तुमच्या जिल्ह्यानुसार मिळून जाईल.
या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता लागणारे कागदपत्र;
१) आधार कार्ड
2) जात प्रमाणपत्र
3) रेशन कार्ड
4) पासपोर्ट साईज फोटो
5) उत्पन्न दाखला
6) यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र
7) मोबाईल नंबर.