मोजक्याच बहिणीच्या खात्यात पैसे का गेले ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीले स्पष्टीकरण August 21, 2024 by krushinews WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात येणार आहे. येत्या 17 तारखेला महिलांना दोन महिन्याचे हप्ते दिले जाणार आहेत. रक्षा बंधनाची भेट म्हणून दोन हप्ते एकदम दिले जाणार आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लाडकी बहिण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा मात्र या योजनेचे 14 ऑगस्ट पासूनच पैसे देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. काही महिलांचे खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण मोजकेच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र मोजकेच महिलांचे खात्यात पैसे का दिले जात आहेत याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्यानंतर .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. सध्या चेकिंग सुरू आहे त्यामुळे मोजकेच महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहेत. 17 तारखेला पैसे ट्रान्सफर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. उद्या 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाही तर तुम्हीच बोंब मारल. त्यामुळे आम्ही आजच हे पैसे पाठविला सुरुवात केली आहे. ही ट्रायल रन सुरू असल्याने मोजकेच महिलांचे खात्यात पैसे आले आहेत .अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा येथे क्लिक करून पहा यादी जो बोलतो ते करून दाखवतो असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केल आहे. आम्ही म्हणत होतो पैसे खात्यात येणार त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सावत्र भावापासून सावध राहा त्यांनाही योजना बंद करायचे आहे .त्यासाठी ते कोर्टात गेले होते. कोर्टाने त्यांना फटकारलं. त्यांचा अर्ज फेटाळून लावला. आमचं सरकार देणार आहे करणार आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही पैसे परत घेणार नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल. ठाकरेंच्या मतदारसंघातूनच सुरुवात झाली आहे ; दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातूनच करण्यात आले आहे. वरळी मतदारसंघावर महायुतीचे प्रचंड लक्ष आहे. या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुती ने चांगलेच फील्डिंग लावली आहे. त्यातच आता लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वरली येथे दिला गेल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
2 thoughts on “मोजक्याच बहिणीच्या खात्यात पैसे का गेले ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीले स्पष्टीकरण”