ऑगस्ट महिन्याचे शेवटचे 10 दिवसात कसा राहणार पावसाचा अंदाज! आली मोठी माहिती समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra weather Update: देशात यंदा पाऊस सरासरी भरून काढत आहे. मात्र देशभरात मान्सूनचे अडीच महिन्याच्या काळात पावसाचे प्रमाण असमान राहिले आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसांमध्ये तर पाऊस सरासरीपेक्षा 15 टक्के अधिक राहिला.

लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा तर!”बँक सिडिंग ” आहे महत्त्वाचे , मिळणार नाही पैसे

तर 15 ऑगस्ट पर्यंत यंदाच्या पावसाळ्यात एकशे पाच टक्के पाऊस पडला, असा हवामान विभागाचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. ला निना परिस्थिती ऑगस्ट महिन्याचे शेवटी विकसित होऊ शकते असा अंदाज आहे.

देशात एक ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान 153 मिलिमीटर पाऊस झाला. तरी या काळातील पावसाची सरासरी 133.3 मिलिमीटर असते. म्हणजेच सरासरी पेक्षा 15 टक्के अधिक पाऊस पडला. यंदा जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा 11 टक्के कमी होता. तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा नऊ टक्के अधिक पाऊस पडला. देशात 15 ऑगस्ट पर्यंत 606.8 मिलिमीटर पाऊस पडला.Maharashtra weather Update

महाराष्ट्रात जून, जुलै, अर्धा ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस पडला

पावसाने ऑगस्ट मधल्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी हजेरी लावली. महाराष्ट्र सोबतच मध्य भारतात ही स्थिती आहे. मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र मध्य प्रदेश ,छत्तीसगड ,ओडिसा आणि गोवा राज्यातील सरासरीपेक्षा 1.5 टक्के कमी पाऊस झाला. मात्र दक्षिण भारतातील केरळ ,तामिळनाडू ,कर्नाटक ,आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यत सरासरीपेक्षा जवळपास एक टक्का अधिक पाऊस पडला.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी काय ??

मानसून मिशन क्लायमेट फोर कास्टिंग सिस्टमच्या परवानु माना नुसार सध्या स्थिती तटस्थ आहे. ला नीना परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी विकसित होऊ शकते. ला नीना परिस्थिती देशातील मान्सूनसाठी पोषक मानले जाते. त्यामुळे ला नीना परिस्थिती विकसित झाल्याचा फायदा भारतीय मान्सून ला होऊ शकतो. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. म्हणजेच ऑगस्ट च्या शेवटच्या दहा दिवसात खूप पाऊस होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

मोफत ट्रॅक्टर योजना ! राज्य सरकारची मोठी घोषणा, असा करा अर्ज

Leave a Comment