Maharashtra Rain Update : खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये कडक ऊन पडू लागले आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आता ढगाळ वातावरण आणि सूर्यदर्शन देखील पाहायला मिळत आहे.
यंदा सुरुवातीलाच मान्सूनचे चांगले आगमन पाहायला मिळाले. त्यामुळे शेतीची कामेही वेळेत पूर्ण झाली. तसेच जुलै महिन्यामध्ये मोठा अतिवृष्टी सारखा पाऊस पडल्याने अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच पिकांचे देखील मोठे अतोनात नुकसान झाले आहे. Maharashtra Rain Update
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने दिलेला हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये राज्यात कोणत्या भागामध्ये मोठा पाऊस पडणार. शेतकऱ्यांनी याचे पावसापूर्वी नियोजन करता येईल.
तसेच राज्यामध्ये 16 ऑगस्ट नंतर जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, खानदेश, नाशिक, पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजी नगर, अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या 22 जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, जालना, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूप पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
2 thoughts on “महाराष्ट्रात या तारखेपासून पडणार मोठा पाऊस, हवामान विभागाचा नवीन अंदाज पाहिला का?”